कास धरणाचे काम त्वरित पूर्ण करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना

सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1885 रोजी कास धरण बांधण्यात आले.
MLA Shivendrasinharaje Bhosale
MLA Shivendrasinharaje Bhosaleesakal

सातारा : कास धरणाची (Kas Dam) उंची वाढवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सातारकरांचा पाणीप्रश्न (Water) कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यापासून ते वाढीव निधी मिळवून देईपर्यंतचा पाठपुरावा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी (MLA Shivendrasinharaje Bhosale) केला आहे. आज त्यांनी या प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. कास धरणाचे उंची वाढवण्याचे काम लवकर पूर्ण करून सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. (MLA Shivendrasinharaje Bhosale Demand To Complete The Work Of Kas Dam Height)

सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 1885 रोजी कास धरण बांधण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस सातारा शहराचा विस्तार वाढत गेला, लोकसंख्या वाढली. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांनी कास धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. मार्च 2011 मध्ये आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या मागणीवरून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कास धरण प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून या प्रकल्पाला 42 कोटी निधी मिळाला. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरू झाले. मात्र, कालांतराने वाढीव निधीअभावी हे काम रखडले. पुन्हा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून वाढीव निधीला प्रशासकीय मान्यता मिळवली, तसेच 58 कोटी रुपये वाढीव निधीही मंजूर करून घेतला.

पालिकेत सत्ता नसतानाही सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी झटणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांनी हा वाढीव निधी मिळवून हा प्रश्‍न कायमचा मार्गी लावला. त्यामुळे निधीअभावी थांबलेले काम पुन्हा सुरू झाले. कास धरणाची उंची 12.42 मीटर वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उंची वाढवल्यानंतर या धरणात 500 दलघन फूट पाणीसाठा होणार आहे. शिवेंद्रसिंहराजेंनी आज सकाळी या प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी नगरसेवक अमोल मोहिते, शकिल बागवान, रवींद्र ढोणे, राजू गोरे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे, कास प्रकल्पाचे उपअभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिफ मोमीन आदी उपस्थित होते. प्रकल्पाच्या सांडव्याचे बांधकाम सुरू असून, दोन्ही बाजूच्या संरक्षक भिंतींचे कामही सुरू आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर येत्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

कोविड सेंटर उभारणीत खासदार रणजितसिंहांचे प्रामाणिक प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून कौतुक

MLA Shivendrasinharaje Bhosale Demand To Complete The Work Of Kas Dam Height

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com