निवडणुकीत NCP सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील : शिवेंद्रसिंहराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivendraraje Bhosale

बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) मोठ्या राजकीय उलाढालीनंतर आज रविवारी मतदान होत आहे.

'निवडणुकीत NCP सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील'

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) मोठ्या राजकीय उलाढालीनंतर आज रविवारी मतदान होत आहे. जिल्हा बॅंकेत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील याची मला खात्री असून बॅंकेत पुन्हा आमचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आज (रविवार) पार पडत असून यामध्ये सातारा (Satara) शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ही मतदान प्रक्रिया सुरुय. अत्यंत चुरशीची असणाऱ्या या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान, आज सकाळी या मतदान केंद्रावर सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमचे सहकार पॅनल विजयी होऊन बॅंकेत पुन्हा आमचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: Big Fight : सेनेच्या गृहराज्यमंत्र्यांसमोर राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेवून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला पूर्णपणे यश आलं नाही. या निवडणुकीत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सातारा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भूमिका महत्त्वाची असून यापूर्वी प्रचारादरम्यान त्यांनी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते आणि आता त्यांनी विजयाची देखील खात्री दिली असून बॅंकेत आमचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान, सकाळी जावळी तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरु असताना उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक आणि उमेदवार ज्ञानदेव रांजणे समर्थक यांच्यात वादावादी झाली आहे.

हेही वाचा: Satara Bank Election : कऱ्हाडला 90 टक्के मतदान

loading image
go to top