MNS : बेकायदेशीर भोंग्यांवर त्वरित कारवाई करा; मनसेची पोलिसांकडं मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

loudspeakers on illegal mosques

अनेकांनी स्पीकरवरून होणारी अजान व आरत्या बंद केल्या आहेत.

बेकायदेशीर भोंग्यांवर त्वरित कारवाई करा; मनसेची पोलिसांकडं मागणी

कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी लाऊड स्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. त्या सामाजिक विषयाला कऱ्हाडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही विघातक प्रवृत्तीचे लोक पुन्हा तेढ निर्माण होण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कायद्यातील तरतुदीचा भंग करून जर कोणी लाऊड स्पीकर लावल्यास योग्य ती दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसेतर्फे निवेदनाद्वारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

निवेदनातील माहिती अशी, मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन केले. त्याला सर्वांनी विशेषतः मुस्लिम धर्मीयांनीही (Muslim Religious) चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी स्पीकरवरून होणारी अजान व आरत्या बंद केल्या. या सामाजिक विषयाला कऱ्हाडमध्ये ही चांगला प्रतिसाद मिळाला. समाजामध्ये कसलाही तेढ निर्माण न होता सर्वांनी एकमेकांना समजावून योग्य ती पावले उचलली आहेत. मात्र, काही विघातक प्रवृत्तीचे लोक पुन्हा तेढ निर्माण होण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हेही वाचा: 2500 कोटींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर; भाजपला आणखी कोणता पुरावा हवाय?

विनापरवाना बेकायदेशीर लाऊड स्पीकर त्वरित बंद करावे. स्पीकर परवाना कोणी मागितल्यास त्यांना कायद्यातील तरतुदीप्रमाणे तो द्यावा; परंतु कायद्यातील तरतुदीचा भंग केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, जिल्हा संघटक नितीन महाडिक, उपजिल्हा संघटक प्रवीण गायकवाड, जिल्हा संघटक सतीश यादव, शहराध्यक्ष विनायक भोसले, झुंजार यादव, चंद्रकांत गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Mns Demands Action Against Loudspeakers On Illegal Mosques

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top