
-सुधीर जाधव
सातारा: आयुष्यात काेणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जाेड दिल्यास आकाशाला ही गवसणी घालता येत असते. वालूथ (ता.जावली) येथील माेहिनी अनिल गाेळे-किर्दत (वय २९) यांनी महाराष्ट्र राज्य लाेकसेवा आयाेगाच्या स्पर्धा परीक्षेत सलग तीन वेळा यश मिळवून हॅट्रिक साधली आहे. त्यामुळे माेहिनी गाेळे-किर्दत यांचे सातारा जिल्ह्यातून काैतुक हाेत आहे.