Monsoon Favourite: पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे याठिकाणी भिजण्याचा मनमुराद आनंद घेता येतो, तसेच व्हिजन जावळी यांच्या माध्यमातून नुकतेच या धबधब्याजवळ जाण्यासाठी लोखंडी जिने व शिड्या बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत हा धबधबा आता बऱ्यापैकी सुरक्षित झाला आहे.
Tourists gather at Dund Ghat waterfalls in Satara, a scenic monsoon spot easily reachable by road.Sakal
मेढा : दुंद (ता. जावळी) येथील घाटात छोटे- मोठे अनेक धबधबे आहेत. सुटीच्या दिवशी हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. घाट रस्त्यालगतच धबधबे असल्याने सध्या पर्यटक या धबधब्यांना पसंती देत आहेत.