esakal | सभेतील रेकॉर्डिंग गायब, पालिका कर्मचाऱ्याची कऱ्हाडात चौकशी!
sakal

बोलून बातमी शोधा

सभेतील रेकॉर्डिंग गायब, पालिका कर्मचाऱ्याची कऱ्हाडात चौकशी!

सौरभ पाटील यांनी 22 सप्टेंबरलाही लेखी पत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी 30 सप्टेंबरला पुन्हा लेखी स्मरणपत्र दिले. गांगुर्डे यांनी यापूर्वीही निविदांच्या तारखा बदलण्याची हेराफेरी केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे सभेच्या ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंगही त्यांनी याच पद्धतीने गायब केले आहे.

सभेतील रेकॉर्डिंग गायब, पालिका कर्मचाऱ्याची कऱ्हाडात चौकशी!

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : नगरपालिकेच्या मासिक सभेत झालेल्या चर्चेचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग गायब केल्याबद्दल पालिकेचे प्रोग्रॅम फॅसिलिटी व्यवस्थापक सुरेंद्र गांगुर्डे यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी सचिन पवार यांनी नुकतेच दिले. याप्रकरणी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. 

पालिकेची 21 सप्टेंबर रोजी मासिक ऑनलाइन सभा झाली. त्या सभेचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळावे, अशी मागणी लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी केली होती. त्याबाबत श्री. पाटील पालिका, जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज केला होता. पाटील यांनी सभेदिवशी गांगुर्डे यांना प्रत्यक्ष भेटून या सभेचे व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग द्यावे, अशी सूचना केली होती. 

मर्जीतील अधिकाऱ्यांची दोन शाखांवर वर्दी!

त्यानंतर पाटील यांनी 22 सप्टेंबरलाही लेखी पत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी 30 सप्टेंबरला पुन्हा लेखी स्मरणपत्र दिले. गांगुर्डे यांनी यापूर्वीही निविदांच्या तारखा बदलण्याची हेराफेरी केली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे सभेच्या ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंगही त्यांनी याच पद्धतीने गायब केले आहे. त्यामागे त्यांचा हेतू कळणे गरजेचे आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी स्पष्ट मागणी केली होती. सचिन पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image