माणदेशात 50 हून अधिक पक्ष्यांच्या नव्याने नोंदी

More than 50 new birds were recorded in Manadesha
More than 50 new birds were recorded in Manadesha
Updated on

गोंदवले (जि. सातारा) : किरकसालकरांनी नुकतेच वनभ्रमंती करत पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला. या अभिनव उपक्रमातून किरकसालच्या जैवविविधता प्रदेशात स्थलांतरित पक्ष्यांसह तब्बल 50 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींच्या ई-बर्डवर नव्याने नोंदी करण्यात आल्या आहेत.
 
लोकांना वन्यजीवांची माहिती व्हावी, त्यांचे निरीक्षण करता यावे, तसेच या निरीक्षणातून नव्याने आढळलेल्या वन्यजीवनाचे ई बर्ड या जागतिक दर्जाच्या वेबसाईटवर नोंदी करण्यासाठी किरकसाल जैवविविधता संरक्षण व संवर्धन समितीने पुढाकार घेऊन नुकताच पक्षी दिवस साजरा केला. या निमित्ताने निरीक्षकांच्या दोन पथकांनी किरकसालच्या परिसरातील खोऱ्यासह डांबी परिसर व नळीचा डोंगर परिसरात दोन दिवस पक्षी निरीक्षण केले.

या वेळी वेडा राघू, राखी खाटिक, रानरातवा, लांब-शेपटीचा खाटिक, कंठवाला होला, कापशीघार, कोतवाल, कवड्या गप्पीदास, सातभाई, चीरक, लालपंखी चंडोल, जंगली लावा अशा 50 हून अधिक पक्षी प्रजातींच्या नोंदी करण्यात आल्या. विशेष म्हणजे हिवाळ्यात स्थलांतरित झालेल्या सायबेरियन गप्पीदास, सामान्य खरुची, रिर्चर्डची तिरचिमणी, करड्या मानेचा भारीट व मोंटॅग्यूचा भोवत्या आदी पक्षीदेखील आढळले.
 
या वेळी जैवविविधता समितीचे अध्यक्ष अमोल काटकर, वनरक्षक एम. पी. साळुंखे, एस. एम. गलांडे, ग्रामसेवक विकास गायकवाड, प्रकाश कळसकर, सुनील काटकर, ओंकार सोपान काटकर, चिन्मय सावंत, विशाल काटकर, आदित्य काटकर, श्रेयस जाधव, समीर भारती, संदेश काटकर, निखिल काटकर यांनी सहभाग घेतला. 

वन्यजीव छायाचित्रणाची आवड 

दरम्यान, वडगाव (ता. माण) येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक प्रकाश कळसकर हे नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. किरकसालच्या पक्षी निरीक्षण उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन त्यांनी वन्यजीव छायाचित्रणाची आवड यानिमित्ताने जोपासली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Arrives at Dare Village
Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Marathi News Esakal
www.esakal.com