मोरगिरी : उमेदवारीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Morgiri Many kneeling candidature

मोरगिरी : उमेदवारीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

मोरगिरी: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या मारुल हवेली गटात इच्छुकांनी जुळवाजुळव सुरू आहे. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. याच गटात त्यांनी स्वतःकडे लक्ष वेधण्याचा इच्छुकांचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: Satara : सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचं जबरदस्त वर्चस्व

जिल्हा परिषद आणि पंचायत गणाची नव्याने पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या गटाचे विभाजन केले जाणार आहे. त्यामुळे पाटणमध्ये पंचायत गणांची संख्या वाढणार आहे. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मोरणा विभागातील मारुल हवेली मतदारसंघ हा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा बालेकिल्ला मानला जातो. मारुल हवेली जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व सुग्रा खोंदू करीत आहेत. नाटोशी पंचायत गणाचे प्रतिनिधित्व निर्मला देसाई, मारुल हवेली पंचायत गणाचे प्रतिनिधित्व संतोष गिरी करीत आहेत. हे तीनही सदस्य मंत्री देसाई यांचे नेतृत्व मानणारे आहेत. श्री. देसाई यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे. त्याचाही उपयोग या विभागात शिवसेनेची ताकद वाढायला झाला आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुका, सोसायटी निवडणुकीत शिवसेनेला चांगले य़श मिळाले आहे. हीच स्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपर्यंत राहील, अशी आशा आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कुणाला न दुखवता आपली माणसं जपली आहेत.

हेही वाचा: Satara : धरणातील गढूळ पाणी नदीपात्रात

पक्ष वाढवताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू ठेवले आहे. शिवसेनेला लोकांसाठी पुढे होऊन एका एका मतासाठी झटावे लागणार आहे. मोरणा विभागात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इच्छुक सध्या उमेदवारीसाठी धडपडत आहेत.

Web Title: Morgiri Many Kneeling Candidature

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..