
Prasad Bharti with his proud mother, celebrating his double success in the MPSC exams.
Sakal
-भोलेनाथ केवटे
सातारा: परिस्थिती कितीही बिकट असो, आईच्या डोळ्यातलं स्वप्न आणि मुलाच्या मनातली जिद्द एकत्र आली, तर कोणतंही शिखर गाठता येतं. जांब (ता. वाई) येथील प्रसाद भारती याची ही गोष्ट फक्त यशाची नाही, तर एका आईच्या संघर्षाची आणि मुलाच्या तळमळीची आहे. प्रसादने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्य कर निरीक्षक वर्ग दोन आणि सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग दोन अशा दोन्ही पदांवर एकाचवेळी बाजी मारली आहे. हेयश केवळ त्याचं नसून त्याच्या आईच्या त्याग आणि कष्टाचं प्रतीक आहे.