गिर्यारोहक प्रियांकास सातारा जिल्हा बँकेची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रियांका मोहितेच्या वडिलांकडे  धनादेश देताना.

गिर्यारोहक प्रियांकास सातारा जिल्हा बँकेची मदत

सातारा - साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते पुढील आठवड्यात जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या कांचनगंगा गिरीशिखरावर चढाई मोहिमेत सहभागी होणार आहे. या खडतर मोहिमेचा खर्च मोठा असल्याने या मोहिमेसाठी जिल्हा बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रियांका मोहिते हिला आर्थिक मदत करण्यात आली आहे. या वेळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते प्रियांका मोहितेचे वडील मंगेश मोहिते यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

प्रियांका मोहिते हिच्या कुटुंबीयांनी या मोहिमेसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्हा बँकेने सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक मदत केली आहे. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, सुरेश सावंत, लहुराज जाधव, संचालिका ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे उपस्थित होते.

नितीन पाटील म्हणाले,‘‘ जिल्हा बँक कायमच सामाजिक बांधिलकी जपत असून, जिल्हा बँकेने समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. (कै.) यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत कृषी व सहकारी क्षेत्रातील कार्य बँक आज तळमळीने व निष्ठेने करीत असून, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध प्रकारे अर्थसाह्य केलेले आहे. याची जाणीव ठेऊन बँकेने आर्थिक मदत केली आहे.’’

या वेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचेही भाषण झाले. प्रियांकाच्या पुढील वाटचालीस बँकेचे ज्‍येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील तसेच सर्व संचालकांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Mountaineer Priyanka Gets Help From Satara District Bank

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top