
MP Dhairyasheel Mohite interacting with flood-affected families, assuring complete panchnamas and timely relief.
Sakal
म्हसवड: अतिवृष्टीमुळे म्हसवड शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी प्रशासनाला पंचनाम्याचे सूचना दिल्या, तसेच कोणीही पंचनाम्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाला खबरदारी घेण्यास सांगितले.