'खासदार रणजितसिंहांवर गुन्हा दाखल होत नसेल, तर आत्महत्या करू'

Ranjitsingh Naik Nimbalkar
Ranjitsingh Naik Nimbalkaresakal
Summary

खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात फलटण न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.

फलटण शहर (सातारा) : स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) व संचालक मंडळावर फलटण न्यायालयाने (Phaltan Court) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यास पोलिस चालढकल करीत असल्याचा आरोप करून दिगंबर आगवणे (Digambar Agawane) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर (Phaltan Rural Police Station) आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतल्याने येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

स्वराज नागरी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळ यांच्या विरोधात फलटण न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी दिगंबर आगवणे दुपारी साडेबाराच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले होते; परंतु गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये पोलिसांकडून चालढकल होत असल्याचा आरोप करून आगवणे यांनी गुन्हा दाखल होत नसेल, तर आपण आत्महत्या करू, असा पवित्रा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याबाहेर घेतला.

Ranjitsingh Naik Nimbalkar
धर्म संसदेत भडकाऊ भाषण; वसीम रिझवी, नरसिंहानंदांनंतर दिनेशानंद यांना अटक

यादरम्यान फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिस ठाण्यात स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या फलटण न्यायालयाच्या आदेशाला ९ मे २०२२ पर्यंत स्थगिती देण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार निंबाळकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला ९ मे २०२२ पर्यंत स्थगिती मिळाल्याने हा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com