esakal | वाह, क्या बात है! फलटणात खासदार उभारणार कोरोना सेंटर; रुग्णांना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Care Center

वाह, क्या बात है! फलटणात खासदार उभारणार कोरोना सेंटर; रुग्णांना मोठा दिलासा

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे शहरातील उत्कर्ष लॉज येथे सर्व सुविधांनीयुक्त 75 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार असून, लवकर हे सेंटर जनतेसाठी उपलब्ध होणार आहे.

खासदार निंबाळकर यांनी तालुक्‍यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या वेळी ऑक्‍सिजन, रेमडिसिव्हिर इंजेक्‍शनची उपलब्धता आदींची माहिती घेत गरज भासल्यास आपण स्वखर्चातून 75 बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करू, अशी भूमिका मांडली होती. त्यानुसार खासदार निंबाळकर व नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून व स्वखर्चातून शहरातील मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उत्कर्ष लॉज येथे सर्वसुविधांनीयुक्त 75 बेडच्या कोरोना केअर सेंटरचे काम सुरू आहे. या सेंटरमध्ये ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता असणार आहे.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामध्ये राज्य शासन व प्रशासन यांनी डॉक्‍टर, नर्सेस व इतर स्टाफ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. इतर खर्च खासदार निंबाळकर हे स्वतः करणार आहेत. भाजपचे सर्व पदाधिकारी सेवाभावी वृत्तीने काम करणार आहेत. प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर भूमिका घ्यावी, प्रशासनाने डॉक्‍टर उपलब्ध करून न दिल्यास स्वतः डॉक्‍टर मानधनावर घेऊन हॉस्पिटल चालू करणार आहे, असे खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

loading image