अण्णा भाऊ साठेंच्या भारतरत्नाचा प्रस्ताव पाठवा : खासदार श्रीनिवास पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अण्णा भाऊ साठेंच्या भारतरत्नाचा प्रस्ताव पाठवा : खासदार श्रीनिवास पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कऱ्हाड : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. त्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे खासदार पाटील यांनी पत्र पाठवून लेखी मागणी केली आहे.
रशियापर्यंत पोचलेला फकीरा
 
पत्रात म्हटले आहे, की तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठेंचा जन्मगाव मूळच्या सातारा मात्र, नंतरच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील वाटेगाव आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी गाण्यातून, पोवाड्यातून, लावण्यातून केली होती. माजी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांनी लिहिलेली व गायिलेली लावणी गाजली होती. अण्णा भाऊ साठेंनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या.

पीकविम्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवा, शेतकऱ्यांची मागणी

त्यामध्ये 1959 मध्ये लिहिलेल्या फकिरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लघुकथांचा संग्रह बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाला आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील गाणी लिहिली आहेत. कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना वाटेगाव गाव त्या मतदारसंघात समाविष्ट होते.

कोरोना इफेक्ट : सातारा जिल्ह्यात यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यातर्फे प्रयत्न केले होते. त्या वेळी अण्णा भाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील स्मारकास मदत केली होती. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी आहे. साठे यांनी दिलेल्या साहित्य व सामाजिक योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा. त्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही राज्य शासनातर्फे करावी, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com