शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करा : खासदार पाटील

MP Shriniwas Patil
MP Shriniwas Patilesakal

कऱ्हाड (सातारा) : पुणे-मिरज-लोंढा लोहमार्गाच्या (Pune-Miraj-Londha Railway Project) प्रकल्पग्रस्त नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. रेल्वेच्या विद्युतीकरण व दुहेरीकरण कामामुळे बाधित होणारा जिल्ह्यातील एकही शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांच्याकडे दिल्ली येथे केली. (MP Shriniwas Patil Met On Minister Raosaheb Danve On Pune Miraj Londha Railway Project Issue bam92)

Summary

पुणे-मिरज-लोंढा या लोहमार्गाच्या जमीन अधिग्रहण व अन्य मागण्याबाबत खासदार पाटील यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली.

पुणे-मिरज-लोंढा या लोहमार्गाच्या जमीन अधिग्रहण व अन्य मागण्याबाबत खासदार पाटील यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेतली. भेटीत सविस्तर चर्चा करून मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. खासदार पाटील म्हणाले, ‘‘लोहमार्ग खंडाळा, कोरेगाव, सातारा व कऱ्हाड तालुक्यांतून १०० किलोमीटर अंतराचा मार्ग जातो. मात्र, या मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणे आवश्यक आहे; परंतु विस्तारीकरण आणि विद्युतीकरण प्रकल्प यातील प्रत्यक्ष स्थिती व कागदावरील परिस्थिती यात विसंगती दिसून येत आहे. परिणामी, अनेक पात्र शेतकरी मोबदला मिळण्यापासून वंचित राहू शकतील. ज्या पद्धतीने योग्य नियोजनाअभावी भूसंपादन करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, ते याबाबत असंतोष व्यक्त करत आहेत.

MP Shriniwas Patil
'..तर जयंत पाटील, शशिकांत शिंदेंना रस्त्यावर फिरू देणार नाही'

जमीन अधिग्रहण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत असून, महसूल विभागाच्या नोंदी व रेल्वे विभागाकडील नोंदीमध्ये तफावत असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने प्रथम आपल्या हद्दीची खात्री करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण न करता जमिनीच्या नोंदींची खातरजमा करून सीमा निश्चित करावी, अशी संबंधित शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी आणखी जागेची आवश्यकता असल्यास या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही करावी. त्याबदल्यात त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, तसेच या प्रकल्पाच्या अनुसरण असणारे सर्व प्रश्न पारदर्शकपणे व तातडीने सोडविण्यासाठी संबंधित सर्व विभागांची बैठक बोलवावी.’’

MP Shriniwas Patil Met On Minister Raosaheb Danve On Pune Miraj Londha Railway Project Issue bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com