Satara : मिशीला पीळ मारून काही होत नसतं; उदयनराजेंनी उडवली शिवेंद्रराजेंची खिल्ली

'यावेळेस आम्ही काम करणारे, लोकांसाठी झटणारे उमेदवार देणार आहोत.'
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Summary

'यावेळेस आम्ही काम करणारे, लोकांसाठी झटणारे उमेदवार देणार आहोत.'

सातारा : केवळ अडवाअडवी होत असल्याने लोकहितासाठी आम्ही मनोमिलन तोडले. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळेस सातारा विकास आघाडीचे सर्व 50 नगरसेवक साताऱ्याची जनता निवडून देईल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. दरम्यान, केवळ मिशीला पीळ व ताव मारून होत नसते, त्याला इकडे तिकडे फिरावे लागते, असा टोलाही त्यांनी नाव न घेता आमदार शिवेंद्रसिंहराजेंना (Shivendraraje Bhosale) लगावला.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Amit Shah : गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक; संशयित व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

सातारा नगरपालिकेच्या (Satara Municipal Election) नूतन इमारतीच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, ‘‘काहींनी आम्हाला मधल्या काळात मनोमिलन करून टाका, असे सांगितले. आम्ही ते मान्य करत मनोमिलन केले; पण पुढील पाच वर्षांत मनोमिलनाच्या काळात केवळ अडवाअडवी होऊ लागल्याने लोकांच्या हितासाठी मनोमिलन तोडले. त्यानंतरच्या निवडणुकीत साताऱ्याच्या इतिहासात नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतिहासात लोकांनी त्यांच्याविरोधात कौल दिला. 40 पैकी एक अपक्ष, 38 जागा सातारा विकास आघाडीला आणि आमदारांच्या नगर विकास आघाडीचा एक नगरसेवक निवडून आला. आता यावेळेस आम्ही काम करणारे, लोकांसाठी झटणारे उमेदवार देणार आहोत. त्यामुळे सर्व 50 च्या 50 सातारा विकास आघाडीचे नगरसेवक साताऱ्याची जनता निवडून देईल.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
दोन पाकिस्तानींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करा; भारत-फ्रान्सची UNSC कडं मागणी

हिंमत असेल तर समोरासमोर या

नगर विकास आघाडीची एकही जागा निवडून येणार नाही. कारण लोक त्यांना स्वीकारणार नाहीत. निवडणुकीचा निकाल आताच लागला आहे. त्यांनी आता निवडणुकीला सामोरे यावे. मिशीला पीळ व ताव मारून होत नसते. इकडे तिकडे फिरावे लागते. हिंमत असेल तर समोरासमोर या.’’ आम्ही नगरसेवकपदापासून सुरुवात केली आहे. मी अलगद खासदार, आमदार झालेलो नाही. मागील वेळेस सर्वसामान्य उमेदवार पालिकेचा अध्यक्ष झाला, याचे कारण हेच आहे. लोकांना आता त्यांचा वीट आला आहे, अशी टीकाही त्यांनी नाव न घेता शिवेंद्रसिंहराजेंवर केली.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Shiv Sena : 'धनुष्यबाण' चिन्ह नाही मिळालं तर सर्व बाजूनं आमची तयारी - शंभूराज देसाई

आम्ही कोणतंही गैर काम करत नाही

सातारा पालिकेत आम्ही पैसे खाल्ले असते, तर तुम्हीच सगळ्यांनी हेडलाइन केली असती; पण आम्ही कोणतेही गैर काम करत नाही. गैर खपवून घेत नाही. तसे असते तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवले असते का, असा प्रश्न उपस्थित करून पाच रुपयांचा घोटाळा केला असता तर ते फोकस करून माझ्यावर आरोप केले असते, अशी टीकाही उदयनराजेंनी नाव न घेता शरद पवारांवर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com