MP Udayanraje Bhosale: फाशीशिवाय दुसरी शिक्षाच नाही : खासदार उदयनराजे भोसले; फलटणप्रकरणी तपास गतीने व्हावा
Phaltan Crime Case: फलटणमध्ये डॉक्टर तरुणीने हातावर सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी लक्ष घालून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सध्या हा विषय चर्चेत आहे.
कऱ्हाड: फलटणच्या प्रकाराची चौकशी सुरू आहे. मात्र, त्यात कोणीही दोषी असो, शासकीय यंत्रणेने त्याची चौकशी करावी. या प्रकरणातील दोषीला फाशीशिवाय दुसरी शिक्षाच असू शकत नाही, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.