
भिलार : महाबळेश्वरमधील पर्यटक निवास प्रकल्पाचा ताबा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) खासगी कंपनी टी ॲण्ड टी इन्फ्रा यांच्याकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण झाली आहे. एक ऑगस्ट २०२५ पासून या प्रकल्पाचे संपूर्ण नियंत्रण संबंधित खासगी कंपनीकडे जाणार असल्याने येथील ४० कामगार अक्षरशः शासनाच्या या धोरणामुळे रस्त्यावर आले आहेत.