कऱ्हाडला बंद खोकी, हातगाडे जप्त; पालिकेची जोरदार मोहीम

सचिन शिंदे
Thursday, 29 October 2020

कऱ्हाड शहरातील विविध भागात बेवारस व बंद स्थितीत अनेक हातागाडे उभे आहेत. ते सुरू नाहीत. मात्र, रस्त्याच्या कोपऱ्यात पडून आहेत. हातगाड्यांमुळे त्या भागात घाण होते आहे. त्याशिवाय हातगाडे, खोक्‍यांमुळे त्या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. अशा हातगाड्यांची माहिती पालिकेच्या पथकाने घेतली. त्यात मुकादम राम भिसे यांनी पथकाला घेऊन कारवाई केली.

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरात बेवारस व बंद स्थितीत रस्त्यावर पडून असलेले हातगाडे पालिकेच्या पथकाने जप्त केले. येथील बस स्थानक परिसरात आज (ता. २९) सकाळी मोहीम राबविण्यात आली. 

शहरातील विविध भागात बेवारस व बंद स्थितीत अनेक हातागाडे उभे आहेत. ते सुरू नाहीत. मात्र, रस्त्याच्या कोपऱ्यात पडून आहेत. हातगाड्यांमुळे त्या भागात घाण होते आहे. त्याशिवाय हातगाडे, खोक्‍यांमुळे त्या भागात वाहतुकीची कोंडी होत आहे. अशा हातगाड्यांची माहिती पालिकेच्या पथकाने घेतली. त्यात मुकादम राम भिसे यांनी पथकाला घेऊन कारवाई केली. त्यापूर्वी पालिकेने बंद, बेवारस पडलेल्या, रस्त्यात अडचण होणारे हातगाडे, खोकी संबंधितांनी स्वतः घेऊन जावीत, अशी सूचनाही शहरात फिरवली होती. त्यात कोणीच पुढे आले नाही.

दिवाळी गोड! न्यू फलटण देणार शेतकऱ्यांना पैसे; सभापती रामराजेंची ग्वाही

बेवारस, बंद अवस्थेत पडलेले हातगाडे, खोकी पालिकेच्या पथकाने आज कारवाई करत जप्त केली. त्यामुळे नागरिक व त्या पथकात काही शाब्दिक चर्चा झाली. पालिका कर्मचाऱ्यांनी त्या भागातही खोकी, हातगाडे कोणाचे आहेत, याची चौकशी केली. मात्र, कोणी पुढे आले नाही. अखेर पालिकेच्या पथकाने बस स्थानक व परिसरात पडून राहिलेली खोकी जप्तची कारवाई केली. उद्या ही मोहीम शहरातील मुख्य भागात होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Action On Shops In Karad City Satara News