महाबळेश्‍वरात पालिकेने अतिक्रमणे हटविली

रे गार्डन परिसरातील गाळ्यांसमोरील ओटे जेसीबीने केले उद्ध्वस्त
Municipality removes encroachments Mahabaleshwar
Municipality removes encroachments Mahabaleshwarsakal
Updated on

महाबळेश्वर : धक्कातंत्राचा वापर करून आज नगरपालिकेने रे गार्डन परिसरातील गाळ्यांसमोर करण्यात आलेले ओट्यांचे पक्के बांधकाम जेसीबीच्या मदतीने उद्‌ध्वस्त केले. पालिकेच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे.

Municipality removes encroachments Mahabaleshwar
Goa: भाजपचे ‘कॅथलिक कार्ड’ अन् लोबोंची धूर्त खेळी... कळंगुटमध्ये बाजी कोणाची?

बस स्थानकासमोर पालिकेचे रे गार्डन शॉपिंग सेंटर आहे. त्यातील काही दुकानदारांनी दुकानासमोर रस्त्यांवर अतिक्रमण करून पक्के ओटे बांधले होते. या अतिक्रमणाविरोधात अनेक तक्रारी होत्या; परंतु आजवर राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई केली जात नव्हती; परंतु पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी या अतिक्रमणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन ते वारंवार काढण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांकडे दुकानदारांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आज धक्कातंत्राचा वापर करून मुख्याधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. कर निरीक्षक भक्ती जाधव यांनी सूरज किर्दत व अरुण वायदंडे या अधिकाऱ्यांसोबत कारवाईची मोहीम फत्ते केली.

Municipality removes encroachments Mahabaleshwar
हे सरकार जनतेचं की, दारुड्यांचं? तृप्ती देसाई संतापल्या

जेसीबीच्या मदतीने घेऊनच हे पथक रे गार्डन शॉपिंग सेंटर येथे पोचले. त्यांनी वेळ वाया न घालविता तातडीने दुकानासमोरील पक्के बांधकामातील ओटे उद्‌ध्वस्त करण्यात आले. टॅक्सी स्टॅण्डपासून सुरू झालेली ही मोहीम आंबेडकर चौकापर्यंत पोचली.पालिकेची विशेष मोहीम सुरू होताच काही दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वतः काढण्यास सुरुवात केली, तर काहींना या पथकाने वेळ दिला नाही. त्यामुळे काही दुकानदारांचे ओटे उद्‌ध्वस्त झाले. या वेळी या परिसरात कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com