

Shocking Twist in Khandala Case: Police Crack Murder Mystery, Two in Custody
Sakal
लोणंद: सुखेड (ता. खंडाळा) येथील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून कळंबोली येथील चार जणांनी संगनमताने एकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह सुखेडमधील विहिरीत आणून टाकला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.