
उमेशच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केलाय.
Khandala : उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणाचा कुऱ्हाडीने खून
शिरवळ (सातारा) : भादे (ता. खंडाळा) येथे दगडी वस्ती येथे उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून तिघांनी धरून एकाने कुऱ्हाडीने वार करून उमेश पुरंदर काळे (वय ३३) यांचा काल सायंकाळी खून केला.
याबाबत पोलिसांनी (Khandala Police) दिलेली माहिती अशी, की भादे गावातील दगडी वस्तीवर मैनेश मुकेश भोसले, नीलेश मुकेश भोसले, महेश मुकेश भोसले, राजनंदिनी महेश भोसले यांनी उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून चिडून जाऊन नीलेश भोसले, महेश भोसले, राजनंदिनी भोसले यांनी उमेश काळे यास धरून ठेऊन मैनेश भोसले याने उमेश काळे याचे गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला.
हेही वाचा: धक्कादायक! गर्भवती महिलेवर पतीसमोरचं नराधमांनी केला सामूहिक बलात्कार
ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजता घडली. पोलिस निरीक्षक नवनाथ मदने व सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. चारही संशयितांनी घटना स्थळावरून पोबारा केला. या घटनेची फिर्याद रजनी उमेश काळे (रा. भादे) यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नवनाथ मदने करीत आहेत.
Web Title: Murder Of Young Man At Bhade For Demanding Money Back
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..