25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून; कारण अद्याप अस्पष्ट I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची घटना आज उघडकीस आली.

25 वर्षाच्या युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

कऱ्हाड (सातारा) : युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. कार्वे ते कोरेगाव मार्गावर (Karve to Koregaon Route) ही घटना घडलीय. त्या युवतीची अद्यापही ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पोलिस (Karad Police) पोचले असून पंचनामा सुरू आहे. घटनेनं परिसरात खळबळ उडालीय.

हेही वाचा: राजकीय धुरळ्यानं समीकरण बदलणार? थेट भाजप आमदारचं अजितदादांच्या 'प्रेमात'

कार्वे ते कोरेगाव रस्त्यावर भैरोबा मंदिराशेजारील (Bhairoba Temple) शेतात आज सकाळी युवतीचा मृतदेह पडला होता. तेथून जाणाऱ्यांना तो दिसताच, त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसही त्वरित घटनास्थळी पोचले. त्यांनी पहाणी केली. त्यावेळी सुमारे पंचवीस वर्षीय युवतीचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून झाल्याचे स्पष्ट झाले. घटननं खळबळ उडालीय.

Karad Crime News

Karad Crime News

हेही वाचा: राज्यमंत्र्यांची थेट BJP आमदाराला राष्ट्रवादीत येण्याची 'ऑफर'

पोलिसांकडून युवतीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, कार्वे ते कोरेगाव मार्गावर भैरोबा मंदिर आहे, त्या नजीक उसाच्या शेतात युवतीचा डोक्यात निर्घृण खून झाला. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक आनदराव खोबरे, फौजदार भैरवनाथ कांबळे, भरत पाटीलसह पोलिस कर्मचारी पोचले. युवतीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satarakarad crime
loading image
go to top