
तारळे : तोंडोशी ते मुरुडदरम्यान तारळी नदीवर सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधलेला लोखंडी साकव पूल अखेरच्या घटका मोजत असल्याची स्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी कुंडमळा (ता. मावळ) येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाचे या पुलाच्या स्थितीकडे लक्ष गेल्यावर तो ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आला आहे.