Karad News : लेहमध्ये वसंतगडचा नायब सुभेदार हुतात्मा

कारगीलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कऱ्हाड) येथील नायब सुभेदार हुतात्मा झाले.
Shankar Uklikar
Shankar Uklikarsakal

कऱ्हाड - कारगीलमधील लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगड (ता. कऱ्हाड) येथील नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर (वय ३८) हे हुतात्मा झाले. सोमवारी (ता. ९) ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचे वृत्त समजताच वसंतगड परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव वसंतगड या गावी उद्या (गुरुवारी) येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शंकर उकलीकर यांचे प्राथमिक शिक्षण वसंतगड येथील जिल्हा परिषद शाळेत आणि माध्यमिक शिक्षण वि. ग. माने हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कराडी येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात घेतले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. २००१ साली ते सैन्य दलात भरती झाले होते. सैन्य दलात त्यांनी २२ वर्ष सेवा बजावली होती.

त्यादरम्यान त्यांनी २००८ साली पुर्ण बर्फाच्छादीत शिखरावर चढण्याचा माऊंटींग कोर्स केला होता. त्यात त्यांना एक ग्रेड मिळाली होती. ते सध्या मथुरा मिल्ट्री स्टेशनमधील बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपमधील ११२ इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत होते. तेथुन दिल्ली मुख्यालयातून कारगील क्षेत्रातील लेहमध्ये ४० जवानांना पाचारण करण्यात आले होते.

बर्फाच्छादीत प्रदेशात कार्यरत असताना दुर्घटना होवुन नऊ जवान गाडले गेले आहेत. त्यातील तीघांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये नायब सुभेदार उकलीकर यांचा समावेश आहे. त्यामुळे वसंतगड गावावर शोककळा पसरली आहे. त्याचे पार्थिव तेथुन पुणे विमानतळावरुन उद्या गावी आणले जाण्याची शक्यता आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, आर्या ही सहा वर्षाची मुलगी, आई, भाऊ- भावजय असा परिवार आहे. गावच्या सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. दरम्यान ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत असुन वसंतगड ग्रामस्थांकडून तेथील डोंगराच्या पायथ्याशी अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आल्याचे ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले.

सहा महिन्यापुर्वीची भेट ठरली अखेरची

सैन्यदलातून सुटी काढून गावी वसंतगडला दरवर्षी गणपतीला शंकर उकलीकर येत होते. परंतु, यंदा त्यांना लेह येथील बर्फाळ प्रदेशात सेवा बजावण्याची ड्युटी लागली. त्यामुळे त्यांना तेथुन सुटी न मिळाल्याने त्यांना गावी येता आले नाही. ते सहा महिन्यापुर्वी वसंतगड येथे आपल्या गावी सुट्टीला आले होते. तेव्हा त्यांची कुटुंबियांशी आणि गावकऱ्यांशी भेट झाली होती. ती त्यांची शेवटचीच भेट ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com