

Ajit Dada’s Bond with Nandval Lasted Till His Last Breath
Sakal
-राहुल लेंभे
पिंपोडे बुद्रुक: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नांदवळशी जोडलेले नाते उपमुख्यमंत्री अजितदादांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपले. पवार कुटुंबीयांचे मूळ गाव असलेल्या नांदवळमध्ये दादांच्या अपघाती निधनाने शोककळा पसरली आहे. गावाला प्रगतीच्या वाटेवर नेणारा हक्काचा माणूस आणि गावचा सुपुत्र गेल्याने गावकरी सुन्न झाले आहेत. सकाळी निधनाची बातमी समजताच ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवली. गावात स्मशान शांतता पसरली होती. गाव पोरकं झाल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर होती.