

Narendra Patil Targets District Leadership, Says Satara’s Development Completely Stuck for 15 Years
sakal
सातारा : ‘‘५० वर्षे एकाच घराण्याकडे पालिकेची सत्ता होती. काही चांगल्या गोष्टी झाल्या, तर काही बऱ्या वाईट. गेल्या १५ वर्षांत तर साताऱ्याचा विकास ठप्प झाला. ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून जागा हडपण्याचे प्रकार सुरू झालेत. औद्योगिक वसाहतीमध्ये तर कंपन्याच शिल्लक राहात नाहीत. त्या जागा हॉटेल, मंगल कार्यालय, गोडाऊन यासाठी भाड्याने देण्याचे प्रकार सुरू झालेत. आमचे कोणाशी वैयक्तिक शत्रुत्व नाही. केवळ सत्तेतून काय काय झाले? याचा लेखाजोखा मांडत आहोत. ग्रेडसेपरेटर, भुयारी गटार योजना या कोट्यवधी रुपये खर्चून झाल्या; पण एकाही सातारकरला त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.’’ भुयारी गटार योजनेचे काम कधी पूर्ण होणार? याची तारीख मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या सभेत जनतेला सांगावी, असे आव्हान नरेंद्र पाटील यांनी दिले.