esakal | ..तर माथाडी कामगार मालाची एकही गाडी खाली करणार नाहीत; नरेंद्र पाटलांचा इशारा

बोलून बातमी शोधा

Narendra Patil
..तर माथाडी कामगार मालाची एकही गाडी खाली करणार नाहीत; नरेंद्र पाटलांचा इशारा
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : "माथाडी कामगारांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे व बसने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा माथाडी कामगार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अन्न-धान्य, कांदा-बटाटा, मसाला, भाजीपाला, फळे आदीसह अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या मालाची एकही गाडी खाली करणार अथवा भरणार नाहीत,' असा इशारा माथाडी नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज दिला.

आज मुंबई येथे रेल्वेने कामाच्या ठिकाणी निघालेल्या माथाडी कामगारांना ते अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ठ नसल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाने अडविल्याने महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने संताप व्यक्त करत शासनाने याबाबत तातडीने आदेश न काढल्यास काम बंदचा इशारा दिला आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, ""लॉकडाउनच्या काळात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून माथाडी व संलग्न घटक जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. या घटकाला अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करावे. विमा संरक्षण द्यावे. त्यांना कामाच्या ठिकाणी ये- जा करण्यास रेल्वे, बससेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास परवानगी द्यावी म्हणून संघटनेने मागणी केलेली आहे.''

स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कामगारांना मदत द्या : नरेंद्र पाटील

Edited By : Balkrishna Madhale