esakal | स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कामगारांना मदत द्या : नरेंद्र पाटील

बोलून बातमी शोधा

Narendra Patil
स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या कामगारांना मदत द्या : नरेंद्र पाटील
sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात "ब्रेक द चेन'ची नियमावली जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीची घोषणा केलेली असली तरी कष्टकरी माथाडी कामगारांबाबत मात्र, त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. लॉकडाउनच्या काळात गेल्या वर्षी आणि आतासुद्धा जीव धोक्‍यात घालून राबणाऱ्या या घटकांबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी मदतीची घोषणा केलेली असली तरी कष्टकरी माथाडी कामगारांबाबत मात्र कोणताही निर्णय न घेतल्याने या कष्टकऱ्यांत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील म्हणाले,""गेल्या वर्षी प्रथम लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर राज्यातील विविध बाजार समित्यांकडे काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून भाजीपाला व अन्य जीवनावश्‍यक वस्तूंची चढ-उतार व वाहतूक केली. त्यामध्ये अनेक कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला.

Corona Helpline म्हणजे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा'; बेडसाठी करावी लागतीय वणवण

सुमारे 25 माथाडी कामगारांचा कोरोनाने बळी घेतला. अजूनही त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत शासनाचा काही निर्णय झालेला नाही. आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने मुख्यमंत्र्यांनी "ब्रेक द चेन'ची घोषणा केली आहे. त्यामध्ये अनेक घटकांना त्यांनी दिलासा देणारी भूमिका जाहीर केलेली असली तरी माथाडी कामगारांबाबत मात्र निर्णय घेतलेला नाही. माथाडी कामगार हा सुद्धा कष्टकरी घटक आहे. कारखान्यातील कामगारांप्रमाणे माथाडी कामगारांबाबतही योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करावी.'

नागरिकांनो, थोडंतरी जबाबदारीचं भान ठेवा; सभापती रामराजेंचं आवाहन

गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जीवनावश्‍यक सेवा सुरळीत राहण्यासाठी जिवाची पर्वा न करता कष्टकरी माथाडी कामगार कार्यरत राहिला होता. सुमारे 25 माथाडी कामगारांचा कोरोनाने बळी घेतला. सध्याही असुरक्षितता असतानाही तो राबतोच आहे. शासनाने त्यांना दिलासा द्यायलाच हवा.

-नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते

Edited By : Balkrishna Madhale