लॉकडाउनमध्ये मराठा उद्योजकांना मोठा दिलासा : नरेंद्र पाटील

लॉकडाउनमध्ये मराठा उद्योजकांना मोठा दिलासा : नरेंद्र पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : लॉकडाउनच्या कठीण काळात राज्यातील उद्योग व्यवसायांपुढे अनेक अडचणी उभ्या असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे. मराठा उद्योजकांना मोठा दिलासा देण्याचे काम त्या माध्यमातून झाले आहे, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. 

महामंडळाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या उद्योग व्यवसायांना श्री. पाटील यांनी भेट देऊन उद्योजकांच्या अडीअडचणी व प्रश्न जाणून घेतल्या. कऱ्हाड तालुक्‍यातील मलकापूर, मुंढे येथील लाभार्थ्यांच्याही त्यांनी गाठीभेटी घेतल्या. यामध्ये वजनकाटा व्यावसायिक, मसाले उत्पादक- विक्रेते, वीटभट्टी, ट्रॅक्‍टर, केमिकल, शेळी पालन आणि कुकुटपालन व्यावसायिक, तसेच व्यायामशाळा चालकांचा समावेश होता. ठिकठिकाणी व्यावसायिकांच्या वतीने श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

श्री. पाटील म्हणाले, "जिल्ह्यात आतापर्यंत 1141 लाभार्थ्यांना 86 कोटी 32 लाख रुपयांचे कर्जवाटप महामंडळाच्या माध्यमातून केले असून, लाभार्थ्यांना तीन कोटी 97 लाख रुपयांचा व्याज परतावा दिला आहे. लॉकडाउनच्या काळात उद्योजकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पुढच्या काळातही महामंडळ सर्व उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. महामंडळाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोचवून नवउद्योजक घडविण्यासाठी प्रयत्नशील असून, लाभार्थी, बॅंक अधिकारी व अन्य जबाबदार घटकांना एकत्र घेऊन अडीअडचणी समजून घेत तोडगा काढण्यात येत आहे. अर्थसाहाय्य पुरविण्यात सुलभता येण्याच्या दृष्टीने आवश्‍यक सूचना सर्व संबंधितांना दिल्या आहेत.'' या वेळी सुरेंद्र जाधव, नितीन जाधव, महामंडळाचे समन्वयक राहूल यादव, तुषार पाटील, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com