

Soldier Tushar Bhilare Cremated with State Honours, Family and Villagers Mourn
esakal
-प्रशांत गुजर
आनेवाडी: देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सीमारेषेवर कर्तव्य बजावणारे पवारवाडी(ता. जावळी) येथील सुपुत्र जवान तुषार राजेंद्र भिलारे (वय ३४) अखेर काळाच्या पडद्याआड गेले. सुट्टीवर गावी आले असताना झाडावरून पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तुषार यांच्यावर पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे... अमर रहे... जवान तुषार भिलारे अमर रहे!’ या घोषणांनी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला.