#NavyDay2020 भारत-पाक युद्धात सातारकरांनी समुद्रावर घडविला इतिहास; नौदलात बजावली चोख भूमिका

#NavyDay2020 भारत-पाक युद्धात सातारकरांनी समुद्रावर घडविला इतिहास; नौदलात बजावली चोख भूमिका

सातारा : भारतीय नौदल इ. स 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापलेल्या 'रॉयल इंडियन नेव्ही' (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस 4 डिसेंबर 'नौदल दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात विविध लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागयत सुरुच ठेवली आहे. भारतीय नौदलात देखील सातारच्या दोन सुपुत्रांनी देखील आपली चोख भूमिका बजावत पाकिस्तानच्या सेनेला चित केले. यामध्ये मूळचे ठोसेघरचे सीताराम गोविंद चव्हाण (वय ७२) व साता-यातील नॅशनल कमांडर विष्णू भागवत यांनी आपल्या कौशल्याने पाकिस्तानच्या सेनेला जेरीस आणले होते. सीताराम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण ठोसेघर येथे, तर माध्यमिक शिक्षण साता-यात झाले. तद्नंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे पूर्ण करुन नेव्हीत जाॅईन झाले. इलेक्ट्रीकल ट्रेडमध्ये ते नौदलाच्या बोटीत काम पाहत होते. शत्रूवर नियंत्रण ठेवण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्यासमवेत सातारा जिल्ह्यातील शेख हे देखील होते. १९६७ साली चव्हाण यांनी भारतीय नौदलात आपला ठसा उमटवत उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल भारतीय नौदलाकडून त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात नौदलाच्या इलेक्ट्रीकल मशनरी हाताळण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारतीय नौदलात गेली कित्येक वर्षे सेवा बजावत असलेल्या चव्हाण यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे. सध्या चव्हाण हे नवोदित विद्यार्थ्यांना नौदलाचे धडे देत आहेत.     

कुठल्‍याही देशात सैन्‍य दलाला अनन्‍य साधारण महत्‍त्‍व असते. सैन्‍य दलाच्‍या वेगवेगळ्या शाखाही असतात. पण, ज्‍या देशांना समुद्री किनारा आहे त्‍या देशातील नौदलाला तर खूप सर्तक राहावे लागते. आज 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन आहे. जगातील शक्‍तीशाली नौदलामध्‍ये भारतीय नौदलाचा सातवा क्रमांक आहे. त्‍यामुळेच आपले शत्रूराष्‍ट्र आपल्‍याला घाबररून राहतात. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निर्मिती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे. आयएनएस विराट आणि आयएनएस विक्रमादित्यमुळे भारतीय नौदल जगात सातव्‍या क्रमांकावर आहे.

भारतीय नौदलाविषयी महत्वपूर्ण महिती..

  • भारतीय नौदलाची सुरूवात सन 1934 मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या रॉयल इंडियन नेव्ही या सेनेपासून झाली. भारताला एकूण 7,517 किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे अशा विशाल समुद्र किनाऱ्याची देखभाल करण्यासाठी भारतीय नौदल आहोरात्र डोळ्यात तेल घालून संरक्षण करत असते.
  • भारतीय  नौदलाकडे 155 युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. 200 मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश, तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.
  • युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने माझगाव गोदीमध्ये सन 1966 मध्ये लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत 80 युद्धनौकांची बांधणी करण्यात आली. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com