
NCP leader Shashikant Shinde on hunger strike protesting Mahayuti’s neglect of farmers — “Black Diwali” marked in Maharashtra.
Sakal
सातारा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज असताना केवळ निकष लावून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच मदत पडलेली नाही. महायुती सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक काळी दिवाळी साजरी करत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.