
NCP Satara district president Balasaheb Solaskar addressing party workers ahead of the Zilla Parishad elections; expresses confidence of winning 25 seats.
Sakal
कऱ्हाड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवणार आहे. आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुमारे २५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी येथे व्यक्त केले.