
सातारारोड: खंडाळा- शिरोळ या मार्गाचा भाग असलेल्या पिंपोडे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल स्वातंत्र्यदिनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, राजाभाऊ जगदाळे, तेजस शिंदे, साहिल शिंदे, शिवसेनेचे दिनेश बर्गे, कल्याण भोसले, ॲड. पांडुरंग भोसले, जयवंत घोरपडे, दिलीप अहिरेकर, अमोल राशीनकर, नाना भिलारे, नीलेश जगदाळे, राजेंद्र कदम, विकास कदम, सुधीर फाळके आदींनी प्रश्नांची सरबत्ती केली.