

sunil tatkare
sakal
कऱ्हाड: ‘‘अजित पवार यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) आहे. ‘एनडीए’त भाजप मुख्य पक्ष आणि आम्ही त्यांचे मित्रपक्ष आहोत. ‘एनडीए’मध्ये येण्याची भूमिका ज्यांना सोबत यायचे आहे त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक आहे,’’ असे मत खासदार सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस विलीनीकरणाबाबत कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन करायचा याची माहिती मिळाली, तर मला त्या बाबतीत बोलता येईल, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.