

Screenshot of the fake RTO advertisement offering a driving license for ₹1,999 without a driving test.
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: वाहन चालवण्याची चाचणी न देताच आरटीओचा वाहन चालवण्याचा परवाना १९९९ रुपयात देण्याची सोशल मिडीयावर जाहिरात करुन अनेकांची फसवणुक करण्याचा फंडा काही जणांनी सुरु केला आहे. संबंधित जाहीरातीव्दारे फसवणुक करणाऱ्यांची टोळीच कोल्हापुर आणि पुणे जिल्ह्यात स्रकीय झाली असुन तसे प्रकारही तेथे घडले आहेत. त्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. तो प्रकार उघडकीस आल्यामुळे आता आरटीओने त्याविरोधात धडक मोहिम हाती घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयाने त्यासंदर्भातील जाहीरातीवर वॉच ठेवुन नागरीकांना अशा जाहीरातींना न फसण्याचे आवाहन केले आहे.