

Over 3 Lakh Cards Distributed as ST Prepares for Mandatory NCMC Smart Card Rollout
sakal
सातारा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी एक ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (नॅशनल ऑमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे.