

Satara Doctor Death Mystery Deepens Connection with Another Suicide Surfaces
Esakal
Satara Doctor Death Case: साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आता नवी माहिती समोर येत आहे. एका महिलेनं दावा केला की, महिला डॉक्टरवर माझ्या मुलीचा चुकीचा शवविच्छेदन अहवाल तयार करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. भाग्यश्री मारुती पाचांगणे असं महिलेचं नाव आहे. तिने म्हटलं की, माझ्या मुलीचं लग्न एका लष्करात असलेल्या तरुणाशी झालं होतं. पण सासरी तिचा छळ केला जात होता. अचानक एके दिवशी मुलीनं आत्महत्या केल्याचं समजलं. तिच्या शवविच्छेदन अहवालात आत्महत्या असं लिहिण्यासाठी दबाव टाकला गेल्याचा आरोप महिलेनं केलाय.