esakal | महारुगडेवाडीची पहिली कन्या अमेरिकेला! उच्च शिक्षणासाठी निकीता पाटील रवाना
sakal

बोलून बातमी शोधा

महारुगडेवाडीची कन्या अमेरिकेला! उच्च शिक्षणासाठी निकीता रवाना

परदेशी जाणारी महारुगडेवाडी व उंडाळे पंचक्रोशीतील निकिता ही पहिलीच युवती ठरली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

महारुगडेवाडीची कन्या अमेरिकेला! उच्च शिक्षणासाठी निकीता रवाना

sakal_logo
By
सचिन मोहिते

काले (सातारा): दुर्गम महारुगडेवाडीची कन्या निकीता पाटील हिने आयटी क्षेत्रात भरारी घेण्यासाठी अमेरिका गाठली आहे. परदेशी जाणारी महारुगडेवाडी व उंडाळे पंचक्रोशीतील निकिता ही पहिलीच युवती ठरली आहे. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे.

हेही वाचा: सातारा जिल्ह्यात आज महा लसीकरण! दीड लाख डोस उपलब्ध

उंडाळे पासून दक्षिणेकडे चार किलोमीटरवर असलेले महारुगडेवाडी सवाशे उंबरठा असलेले गाव आहे. निकीताचे वडील पोपट पाटील यांनी गावाकडे कोरडवाहू शेती असल्याने मुंबईलाच आपली कर्मभूमी मानली. त्यांना पत्नी दिपाली यांनी मोलाची साथ दिली. त्यांना एकुलती एक मुलगी निकिताचे शिक्षण पूर्ण केले. निकिताने मुंबईत डिग्री पूर्ण केल्यावर तिने परदेशी शिकण्याची जिद्द मनाशी बाळगली. तिच्या आई वडिलांनी त्याला सहकार्य करत तिला मास्टर डिग्री करण्यासाठी अमेरिका येथे पाठवण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: सातारा: मंदिराचे छत कोसळून एक ठार, तर तिघे गंभीर जखमी

एकुलती एक मुलगी सक्षमपने उभे करण्यासाठी पालकांनी तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळ दिले. अन् तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. उंडाळे, येळगाव, येणपे काले आदी परिसरातील छोट्या मोठ्या गावात ही एकुलती एक पहिलीच युवती अमेरिकेत जात आहेत. त्यामुळे तिचे कौतुक होत आहे. पाटील यांचे मूळ गाव काले आहे. कोरोनाचा पहिला बळी निकिता चे काका होते. कोरोनाच्या संसर्गाने त्यांच्या जाण्याने गाव परिसरात बनलेली ओळख निकीताने पुसून टाकत या कुटुंबाची नवी ओळख बनवली आहे. या तिच्या आयटी क्षेत्रातील शिक्षणासाठी उचलले पाऊल इतर युवतींसाठी प्रेरणादायी आहे.

loading image
go to top