esakal | सातारा जिल्ह्यात आज महा लसीकरण! दीड लाख डोस उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या 350 हून अधिक ठेवण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात आज महा लसीकरण! दीड लाख डोस उपलब्ध

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: राज्यभरात लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 'कोव्हिशिल्ड'चे सर्वाधिक एक लाख 47 हजार 400, तर 'कोव्हॅक्सिन'चे सहा हजार 400 डोस उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज बुधवारी (ता. ८) महा लसीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या 350 हून अधिक ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा: सब जेल, लॉकअपसाठी जागा द्या; शेतकरी संघटनेची मागणी

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सुरवातीला लशीचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात ६० हजारांहून अधिक लसीकरण झाले होते. त्यानंतर लशींचे डोस कमी येण्यास सुरुवात झाल्याने मोहीम मंदावली होती. मात्र, मागील काही दिवसांत लशींची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग येत आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून जिल्ह्याला आतापर्यंत सर्वात जास्त ९० हजार लस उपलब्ध झाली होती. त्यानंतर आज सर्वाधिक दीड लाखाहून अधिक डोस उपलब्ध झाल्याने महा लसीकरण अभियान ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ...अखेर ढेबेवाडीकरांची दूषित पाण्यापासून सुटका

दरम्यान, केंद्राकडून राज्याला लशीचे डोस जादा प्रमाणात उपलब्ध झाल्याने जिल्ह्याला लशीचे डोस मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई व कोरेगाव या पाच शहरांत ऑनलाइन नोंदणीनुसार, तर इतर ठिकाणी टोकण पद्धतीने लसीकरण प्रक्रिया होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: पाटणला रिक्त पदांमुळे रखडल्या मोजण्या; हजारांवर प्रकरणे प्रलंबित

जिल्ह्याला लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने महा लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली असून, नागरिकांनी गोंधळ न करता मोहिमेत सहभागी व्हावे.

- डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

loading image
go to top