esakal | सातारा: मंदिराचे छत कोसळून एक ठार, तर तिघे गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा: मंदिराचे छत कोसळून एक ठार, तर तिघे गंभीर जखमी

sakal_logo
By
सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (सातारा) : वीरकरवाडी (ता. माण) येथे जोरदार पाऊस आल्याने मंदिराच्या आडोशाला बसलेल्या मजुरांवर मंदिराचे शहाबादी फरशीचे छत कोसळले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली.

हेही वाचा: सातारा: जावली तालुक्यात चंदन चोरी करणारी टोळी गजाआड

म्हसवडपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर म्हसवड पालिकेचा वीरकरवाडी हा प्रभाग असुन येथे मायाक्का देवीच्या नविन मंदिराचे बांधकाम सुरु असताना आज दुपारी साडेचारच्या दरम्यान जोरदार पाऊस आल्याने मंदीराचे बांधकामांवर काम करणारे आठ कामगार या मंदिरा नजिकच असलेल्या जुन्या मायाक्का देवीच्या मंदिराच्या आडोशाला सर्व मंदिर बांधकाम करणारे कारागीर मजूर बसले होते.

जुने असलेले हे मायाक्काचे देवीच्या मंदिराचे छत शहाबाद फरशीचे लोखंडी गरडेल होते व छतावर शाडूची माती होती. मंदिराचे छत अचानक खाली कोसळले. या मध्ये चार मजुर गाडले गेले. व उर्वरित चार मजूर बाजूला सरकल्याने बचावले. यावेळी मोठा आवाज होताच गावांतील नागरीक मंदिराच्या दिशेने मदतीस पळाले.

नजिकच जेसीबीचे काम सुरु होते. त्या जेसीबीने फरशी, लोखंडी अ‍ॅगल, माती, दगड बाजुला करुन चौघांनाही बाहेर काढले व म्हसवड येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी चार जणास दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना व्यकट पिराजी दुनवड (वय ७०) यांचा मृत्यू झाला तर पिराजी खंडाचा कोळी (वय २२) रा. भंडारकोवढे जिल्हा सोलापूर, महेश भोई (वय २३) रा. सोलापूर, उद्धव गंगाराम गुंडवड (वय-५०) रा. तांदुळवाडी जिल्हा परभणी हे तिघे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा: टेंभू योजनेचे बाधित घेणार जलसमाधी; रयत क्रांती संघटनेचा इशारा

रामा नामदेव नरवडे, रा. परभणी, दत्ता माणिक गुंडवड ( वय ४०)रा. परभणी, रविनाथ बावडी (वय ४०)रा. भंडाराकवठे जिल्हा सोलापूर, आदिलशहा कोतवाल (वय ३९०) रा. सोलापूर हे सर्वजण या अपघातात किरकोळ जखमी झाले.

या दुर्घटनेत म्हसवड पालिकेचे माजी उपाध्यक्ष दिपक बनगर, रवी विरकर, आप्पा विरकर, हणमंत राखुंडे लक्ष्मण कर्ले, लुनेश शिवाजी विरकर सोपान जठरे आदी विरकरवाडी येथील तरुणांनी धाडसाने पुढे येवून आडकलेल्याचे मदूरांचे प्राण वाचवले. या अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे.

loading image
go to top