
ढेबेवाडी : पावसामुळे परिसरातील विविध गावांतील आणखी नऊ घरांची पडझड झाल्याने महिनाभरात घरांच्या पडझडीचा आकडा ४० वर पोहोचला आहे. महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत असले, तरी जुन्या घरांच्या पडझडीचा आकडा वाढत चालल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांत भीतीचे वातावरण आहे