सातारा जिल्ह्यातील 983 नागरिक उपचारानंतर घरी परतले; 805 जणांचे नमुने तपासणीस

सातारा जिल्ह्यातील 983 नागरिक उपचारानंतर घरी परतले; 805 जणांचे नमुने तपासणीस

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 983 नागरिकांना साेमवारी (ता.28) घरी सोडण्यात आले आहे. याबराेबरच 805 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 70, कराड 19, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, कोरेगाव 49, वाई 83, खंडाळा 79, रायगांव 97, पानमळेवाडी 46, मायणी 28, महाबळेश्वर 50, पाटण 10, दहिवडी 42, खावली 17, तळमावले 31 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 134 असे एकूण 805  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी  माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

शाहूपूरी पाेलिसांचा निर्धार; खंडणी उकळणाऱ्या महिलांच्या तक्रारदारांपर्यंत पोचणार

  • घेतलेले एकूण नमुने 126230
  •  
  • एकूण बाधित 35870
  •  
  • घरी सोडण्यात आलेले  26497
  •  
  • मृत्यू 1096
  •  
  • उपचारार्थ रुग्ण  8277

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com