Watch Out आवाज आला की छातीत धस्स व्हायचं! साता-यातील ट्रेकर्सकडून लिंगाणा सर

Watch Out आवाज आला की छातीत धस्स व्हायचं! साता-यातील ट्रेकर्सकडून लिंगाणा सर

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजेंचा जयघाेष करीत आम्ही एक एक टप्पा सर करीत हाेताे. ठरल्याप्रमाणे एखादे संकट आल्यास अन्य शिलेदारांना त्याची कल्पना देण्यासाठी वाॅच आऊटची आराेळी द्यायचाे. खरं तर ही आराेळी कानी पडताच छातीत धस्स व्हायचं, पण हा सावधानेताच इशारा असल्याने सतर्क हाेऊन पुढे मार्गक्रमण करीत राहिलाे. कधी सरळ चढाई आणि कातळ दगड चालून तर कधी दोरीने वर चढून लिंगाणाच्या बेलका सूळक्यावरती चढलो आणि समोर फडफडणारा भगवा पाहून दोन्ही गुडघ्यांवर नतमस्तक झालाे. 

साता-यातील नऊ जणांच्या समूहाने नुकताच लिंगाण सर केला. यामध्ये दत्तात्रय मोहिते, पराग सुभेदार, महादेव निकम, किरण निकम, मंदार मुरुडकर, विशाल पाटील, शुंभागी मुरुडकर, अखिलेश मुरुडकर, कौस्तुभ मुरुडकर व त्यांच्या कुटुंबियांचा समावेश हाेता. ही माेहिम माझ्यासाठी अवघड नव्हती पण तशी आव्हानात्मक हाेती असे विविध ट्रेकसचा अनुभव असलेले दत्तात्रय माेहिते यांनी नमूद केले. 

ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लिंगाणा किल्ल्यावर आज जाणार या भावनेनंच मन प्रफुल्लित होऊन गेलं होतं. वेल्हे गावातून मोहरी या गावी जाण्यासाठी आम्ही मार्गक्रमण करत असताना मोहरी गावाकडे जात असलेला रस्त्यानेच आम्हांला पहिल्या ट्रेक घडवला अतिशय दुर्गम अशा ठिकाणी जाताना अतिशय खराब असा रस्ता आम्ही नेलेली गाडी इथेच मोडून पडते की काय
अशी शंका उपस्थित झाली त्यानंतर काही वेळातच आम्ही मोहरी या गावात पोहोचलो.

मोहरी गावात पोहोचताच आम्हांला शिलेदार टीमने दुसऱ्या दिवसाचा प्लॅन सांगितला आणि पहाटे आपल्याला तीन वाजता लिंगाणा सर करण्यासाठी जायचं आहे अशा सूचना दिल्या. रात्री झोप काही लागतच नव्हती कारण दुसऱ्या दिवशी लिंगाण्याच्या थरार अनुभवायचा होता आणि मनात एक प्रकारची भिती आणि कुतूहलही होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन चरणांनी स्पर्शीलेला लिंगाणा जो म्हणे कैद्याना कैद करण्यासाठी वापरला जात होता. लिंगाणा सुळका २९६९ फूट उंच आजूबाजूला दिसणारा रायगड, तोरणा, दुर्गेश्वर राजगड आणि बऱ्याचं नाळीने शोभा वाढविलेला लिंगाण्याचा
सुळका त्यावर सूर्य नारायण रंगप्रकाश टाकीत होता. पहाटे स्वच्छ वातावरण पूर्वेवून दिसणारा मंद प्रकाश लिंगाण्याकडे जाणाऱ्या पायवाट खुणावत होत्या. समोर लिंगाणा आकाशी झेप घेत होता, पहाटे आवरा आवर करून, आम्ही सगळे मावळे तयारीला लागलो. एकूण २९ जणांचा आमचा समूह आवरा आवारी करून, हलका नाष्टा घेण्यासाठी सरपंचाचे घरी गेलो. उपमा आणि चहा घेऊन आम्ही प्रत्येकाची ओळख परेड केली. मोजणी झाली आणि आम्ही सर्व शिलेदार निघालो लिंगाणाकडे.

Hows The Josh! निपाणीच्या पोरीनं जिंकलं दिल्लीचं तख्त; सुप्रियाची सैन्य दलात फिनिक्स भरारी
 
बॅटरीच्या आणि मोबाइलच्या टॉर्चच्या मंद उजेडात पहाटे चार वाजता चालताना कधी पायवाट मातीचा धुरळा उडवायची तर मधेच वाटेत येणारा दगड पायाला लागायचा, जंगलाच्या मधून जाणारी वाट चालताना प्राणवायू मात्र खुप मिळायचा,चालत चालत आम्ही कधी बोऱ्याटाच्या नाळेच्या  जवळ कधी  पोहचलो कळलं नाही बोऱ्याटयाची नाळ निमुळती, सरळ खाली झेप घेणारी, काळया कुळकुळीत दगड कपारीतुन जाणारी निसरडी वाट, गोल गोटे आणि कपऱ्या हे दगडाच रूपं त्या निसर्गान बनवलेल, आम्ही चालू लागलो मध्ये कुठे तरी दोरीचा आधार घेता उतरावे लागत होते, तर मधेच एखादा दगड पायाखालून निसटून जाता होता. शिलेदार टीमनं आम्हाला सुरुवातीला सूचना दिल्या होत्या कि वाट ही निसरडी आणि दगडाची असल्याने एखादा दगड जर सुटला तरी लगेच दगड ज्याच्याकडून सुटला आहे त्याने वॉच आऊट असा आवाज करून खालच्या सावध करायचे. वॉच आऊटचा आवाज आला की छातीत धस्स व्हायचं. वाचआऊटचा आवाज मधेच घुमत होता. असं करत करत आम्ही सर्वजण एकदा रायलिंग पठाराच्या मध्यवर्ती कडेला पोहचलो. एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला पठाराचा कडा त्याला पकडत पकडत लिंगाणा बेस पर्यन्त पोहचलो. 

बेस कॅम्पवर एक टेम्पो लावला होता आणि आम्हाला तेथेच सूचना करण्यात आल्या आणि प्रत्यक्ष लिंगाणा चढाईला सुरवात करण्यात आली. बेस कॅम्पवर शिलेदार टीममधील सागर दादा, तुषार, ऋषिकेश, राकेश, विनायक तयारच होते. शिलेदार टीमचे प्रमुख सागर दादांनी आम्हाला सूचना देऊन सर्व ट्रेकिंगचे साहित्य कसे लावायचे त्याचा काय वापर याची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले. आम्ही हार्नेस, बेल्ट, कॅरा, हेल्मेट घेऊन तयारीला लागलो. आमच्याबरोबर संभाजीनगरचे वीस ट्रेकर्सचा ग्रुप आणि आमचा सातारकरांचा नऊ ट्रेकर्सचा ग्रुप असा एकोणतीस ट्रेकर्सचा ग्रुप लिंगाणा सर
करण्यासाठी तयार झाला. आमच्याबरोबर माझे मित्र पराग सुभेदार, महादेव निकम, किरण निकम, विशाल पाटील आणि मंदार मुरुडकर आणि त्याची चार जणांची फॅमिली असल्याने आम्ही एक साथ चालायचं ठरवलं.  संभाजीनगरकर फारच उत्साही असल्याने आणि त्यांचं ग्रुपही मोठा असल्याने त्यांनी सर्वप्रथम चढायला सुरुवात केली. त्यांचा उत्साह आणि रांगडेपणा पाहून तसेच आमच्याबरोबर मुरुडकर वहिनी आणि त्यांची दोन मुलेही असल्याने आम्ही संभाजीनगरकरानंतर शेवटी लिंगाणा सर करायचे ठरवले.

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा

लिंगाणा चढाईला सुरवात झाली. समोरील कातळावर माथा टेकवला आणि आणि आम्हा सर्वांच्या सुखरूपतेची प्रार्थना केली छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा मोरया, शिवशंभु राजे संभाजीराजे या जयघोषांनी बेस कॅम्प दणाणून गेला. लिंगाणाच्या सुरवातीला असलेल्या चिमणी कातळ चढाई सुरवात केली. हळू हळूच ती सर करून पुन्हा वरील उंबराच्या
झाडाजवळील कातळ चढाईला लागलो. पहिला टप्पा पूर्ण केल्यावर समोर दिसणाऱ्या रायलीगं पठाराचे दृश्य डोळे भरून पहिले, त्याच ठिकाणी एक गुहा म्हणजेच सदर आहे. या ठिकाणी ४० एक लोक बसू शकतात, तसेच याच ठिकाणी पाण्याच टाक आहे. येथे २४ तास पाणी उपलब्ध असते आणि इतक चविष्ट आणि स्वच्छ की ते पिल्यावर मन तृप्त होते. अगदी निसर्गाचा अक्वागार्डच म्हणावा त्याला.

थोडी विश्रांती घेऊन आणलेला माझ्या सोबत्यांनी कोरडा शिदा खाऊन घेतला. मी कायम ट्रेक करत असल्याने कोरडा शिधा पेक्षाही मी कायम मोसंबीसारख्या किंवा सफरचंदासारखा फळांना फार महत्त्व देतो. त्यामुळे माझ्या बॅगेत कायम अशी फळेच असतात थोडीफार पेटपूजा करून घेतली. पुन्हा पुढंचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास चालू केला. व्ही नॉच पायवाट, सरळ चढाई आणि कातळ दगड चालून, कधी दोरीने वर चढून एकदाच लिंगाणाच्या बेलका सूळक्यावरती चढलो. तोच समोर फडफडणारा भगवा पाहून आलेला थकवा निघून गेला. लिंगाणा सुळक्यावर जाताच मी भाळी माती लावून आणि दोन्ही गुडघ्यांवर नतमस्तक होऊन प्रथम वंदन केले. यापूर्वी मी केलेल्या हिमालयातल्या ट्रेकमध्येही मला असा अनुभव आला नव्हता की जो अनुभव मला लिंगाणयाने दिला, पदोपदी काय मला कुटूंबाची तसेच माझ्या मित्रमंडळींची आठवण येत होती काही पॅचला तर असे वाटते की हा आपला शेवटचा ट्रेक.यावर्षी २०२१ मधे शंभर गडकोट करायचे अशी माझी भीमगर्जना येथेच विरती की काय असे सतत वाटत होते. तदनंतर मात्र भारतमातेच्या जयघोषाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले. माझे मित्र पराग सुभेदार यांनी दिलेल्या शिवगर्जनेने तर वातावरणात इतकी प्रफुल्लता आली की मुरुडकर वाहिनींचा तर पूर्ण ट्रेकचा शिणवटा गेल्याचे त्यांना सांगितले.

शेतक-याने दिला जून्या परंपरेला उजाळा; वाणवसासह लाडक्या लेकीची पाठवणी केली बैलगाडीतून

वरती सुटलेला सुसाट तर मंद वारा, पश्चिमेला दिसणारा दुर्ग रायगड त्यावरील मंदिर, महाराजांची समाधी, कोकणदिवा किल्ला पूर्व दिशेला राजगड आणि तोरणा तसेच वरून दिसणाऱ्या सिगापूर नाळ, बोराटयाची, बीब्याची नाळ, अग्याची नाळ, रायलीगं पठार, समोरून वाहणारी नदी, सगळी दृश्य पाहून मन प्रसन्न झालं, दिवसभर केलेल्या कष्ट आणि धाडसाच चीज झालं. दिवस मावळतीला जाईल आणि उतरती वाट अवघड होईल म्हणून लवकरच उतरणे चालू केले. वरून दिसणार दृश्य डोळ्यात, हृदयात आणि थोडं कॅमेरामध्ये साठवून आम्ही शिलेदार उतरणीला लागलो. उतरताना रॅपलिंग करायचं असे दादाने सांगितलं आणि आम्हाला एक वेगळाच अनुभव घेण्याचा प्रसंग आला. माझे मित्र कैलास बागल यांच्यामुळे रॅपलिंग यापूर्वीही मी किल्ले अजिंक्यताऱ्यावर केले होते. तरीही लिंगाण्याची उंचीवरिल रॅपलिंग अजिंक्यतारा इथले रॅपलिंगची उंची हे पाहून मनात धस्स झाले. तरीही पर्याय नव्हता आणि आम्ही रॅपलिंगला सुरूवात करून उतरनीस
लागलो. दुपारी दाेनच्या सुमारास लिंगाणा बेसला आलो. सकाळी ज्या ठिकाणी नतमस्तक झालो होतो   त्याच ठिकाणी डोकं टेकून नमस्कार केला. बोराट्याची नाळ परत पुन्हा चालत चालत असताना मात्र पहाटेच केलेले दिव्य पुन्हा आठवले कारण त्यासमयी काहीही दिसत नसताना जे दिव्य पार पाडले ते परत एकदा पाहण्याचा योग आला   बोराटीच्या नाळेला सलाम करून आम्ही मोहरी गावाकडे प्रयाण केले आणि मोहरी गावात अखेर दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो.

बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! जवान प्रदीप चव्हाणांच्या चित्रांचे देशभर प्रदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com