कऱ्हाड - जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांना आमदारकी बहाल केली. त्याच खासदार पवार यांच्या नातु आमदार रोहित पवार यांच्यावर ते टिका करत आहेत. त्यांची पवारांवर बोलण्याची पात्रता नाही.
निरमा पावडर आणि दुधाने त्यांनी स्वतःचे चारीत्र्य स्वच्छ करून घेण्यासाठी मिटकरी यांच्या अकोल्यातील घरी निरमा पावडर आणि दुध कुरीयरने पाठवत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव समीर कुडची यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमदार पवार यांच्यावर आमदार मिटकरी हे सातत्याने टिका करत आहेत. त्यामुळे रोहित पवार गट आक्रमक झाला आहे. त्यांच्या वक्तव्यांचा समाचार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव कुडची यांनी घेतला.
ते म्हणाले, जेष्ठ नेते खासदार पवार यांनी मिटकरी यांना आमदारकी बहाल केली. त्याच खासदार पवारांच्या नातवांवर ते टिका करत आहेत. आमदार अमोल मिटकरी हे आमदार रोहित पवार यांच्यावर सातत्याने टीका करत आहे.
मिटकरी यांची पवारांवर बोलण्याची पात्रता नाही. मिटकरी यांनी निरमा पावडर आणि दुधाने स्वतःचे चारीत्र्य स्वच्छ करून घ्यावे. त्यासाठी मिटकरी यांच्या अकोल्यातील घरी निरमा पावडर आणि दुध कुरीयरने पाठवत आहोत. चारीत्र्य स्वच्छ करुन घ्यावे आणि मगच आमदार रोहीत पवार यांच्यावर बोलावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.