

Union Minister Nitin Gadkari with Karad North MLA Manoj Ghorpade during their meeting in Nagpur.
sakal
काशीळ: कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील रस्त्यांसाठी, तसेच पुलांच्या कामांना भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आमदार मनोज घोरपडे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उंब्रज उड्डाणपूल मंजूर केल्याबद्दल आमदार घोरपडे यांनी मंत्री गडकरी यांचा शाल, श्रीफळ आणि सातारी कंदी पेढे देऊन त्यांचे आभार मानले. त्यावेळी चर्चेत ते बाेलत हाेते.