विधातेंच्या गोटात ना जल्लोष, ना विजयी मिरवणूक; आमदार शिंदेंचा पराभव लागला जिव्हारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधातेंच्या गोटात ना जल्लोष, ना विजयी मिरवणूक

विजय घोषित केल्यानंतर विधातेंच्या कार्यकर्त्यांनी कुठेही गुलालाची उधळण केली नाही. सातारा आणि खटाव येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली नाही.

विधातेंच्या गोटात ना जल्लोष, ना विजयी मिरवणूक

सातारा : जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत ओबीसी प्रवर्गातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊनही सहकार पॅनलचे प्रदीप विधाते यांच्या गोटात ना जल्लोष करण्यात आला ना विजयी मिरवणूक काढण्यात आली. आमदार शशिकांत शिंदे, नंदकुमार मोरे, मनोज पोळ आणि शिवाजीराव महाडिक यांचा निसटता पराभव झाल्याने विधाते समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला नाही.

हेही वाचा: रामराजे सातारा जिल्ह्याला लागलेला 'कॅन्सर' : शेखर गोरे

इतर मागास प्रवर्गातून सहकार पॅनलचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी तब्बल १०८० मतांनी सर्वात मोठा विजय मिळवला. विधातेंना १४५९ तर विरोधी शेखर गोरेंना ३७९ मते मिळाली. विधाते यांचा विजय घोषित होण्यापूर्वी जावली, कोरेगाव, खटाव, माण तालुका सोसायटी मतदारसंघाचे निकाल घोषित झाले होते. त्यात आमदार शशिकांत शिंदे, नंदकुमार मोरे आणि शिवाजीराव महाडिक, मनोज पोळ या सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा निसटत्या फरकाने पराभव झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. विधातेंचा ओबीसी प्रवर्गातील विजय निश्चित होता. मात्र, सहकार पॅनलचा खटाव, कोरेगाव, माण, जावळीत पराभव झाल्याने विधातेंनी विजयाचा जल्लोष साजरा केला नाही. मतमोजणी केंद्रातून बाहेर पडतानाच त्यांना अश्रू अनावर झाले होते. विजय घोषित केल्यानंतर विधातेंच्या कार्यकर्त्यांनी कुठेही गुलालाची उधळण केली नाही. सातारा आणि खटाव येथे विजयी मिरवणूक काढण्यात आली नाही.

हेही वाचा: पराभवानं कोणी NCP कार्यालय फोडलं, तर कोणी फटाक्यांची आतषबाजी केली

शेतकऱ्यांच्या हिताचे काम करतच रहाणार आहे.

सर्व जिल्ह्यातील मतदारांनी सहकार पॅनल आणि माझ्यावर विश्वास दाखवून मला मताधिक्य दिले. बॅंकेच्या माध्यमातून यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणार आहे. आमचे नेते आमदार शशिकांत शिंदे,नंदकुमार मोरे, शिवाजीराव महाडिक सर आणि मनोज पोळ यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्त्यांना जल्लोष साजरा न करण्याचे आवाहन प्रदीप विधाते यांनी केले.

loading image
go to top