जिलेबीचा गोडवा, कोरोनामुळे कडवा... आला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बाळकृष्ण मधाळे
Tuesday, 11 August 2020

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला जिलेबीच्या गोडीची जोड देणे ही साता-याची खासियत. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात टनावर जिलेबीची उलाढाल होते. या वर्षीही आनंद जिलेबीच्या पाकात मुरवूनच स्वातंत्र्यदिनाचा घेण्यास साताकर सज्ज होते, तसेच जिलेबीसोबतच इतरही मेवामिठाईची दुकाने ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सज्ज झाली होती.

सातारा : स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबंधित देशाच्या राजकीय दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट 1947 हा आहे. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम, नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे, एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या पर्वणीला, जुलमी ब्रिटीश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणा-या आणि आयुष्य वेचणा-या स्वातंत्र्य सैनिकांना श्रध्दांजली वाहिली जाते. सातारा जिल्हा हा देशात सैनिकांचा जिल्हा म्हणून सुपरिचित आहे. सातारा शहराला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी प्राप्त असून छत्रपती शिवरायांची राजधानी देखील आहे. स्वातंत्र्यदिना निमित्त जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात जिलेबी खाण्याची परंपरा आहे.

कोरोना उपचारासाठी कागदपत्रे बरोबर ठेवा, हे आरोग्यमित्र तुम्हाला करतील मदत
 
सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून अनेकांना यात आपला प्राण गमवावा लागला आहे. मात्र, आपल्यावर कितीजरी संकट आली, तरी देशभक्ती कधी कमी पडू द्यायची नाही, याचीच प्रचिती सध्या साता-यात येत आहे. अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात रेलचल पहायला मिळत आहे. प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी साता-यात वेगळीच पर्वणी पहायला मिळते. या दोन्ही सणाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात दिवाळी सारखा उत्साह पहायला मिळतो. सध्या येथील बाजारपेठेत विविधरंगी फुले दाखल झाली आहेत. मुख्य बाजारपेठेसह पोवई नाका येथील दुकांनामध्ये खादी कपड्यांची विशेष मागणी आहे. कोरोनामुळे चाकरमानी देखील गावीच असल्याने यंदा स्वातंत्र्यदिनाचा उत्साह व्दिगुणीत होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच प्रत्येक जण प्लॅनिंग करीत आहे. प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाला गोड जिलेबीची जोड देऊन आनंद व्दिगुणीत करण्याची थेट 1947 पासूनची परंपरा सातारकर आजही जपत आहेत. या दिवशी साता-यात झोपडीपासून महालापर्यंत गरम जिलेबीचा आस्वाद अनेकजण घेत असतात. साता-यात राजवाड्यापासून उपनगरापर्यंत सर्वत्र जिलेबीचे खास स्टॉल उभारले जातात. आता तर गेल्या काही वर्षांपासून साजूक तुपातील जिलेबीला देखील सातारकर पसंती देऊ लागले आहेत. शहरात सध्या लॉकडाउन सुरु असले तरी बाजारपेठ संध्याकाळी सात वाजेपर्यंत खूली असते. दुपाराच्या वेळेस वर्दळ कमी प्रमाणात पहायला मिळत आहे. शहरातील शासकीय विभागातही आतापासूनच झाडलोट सुरु आहे. कोरोनामुळे यापूर्वीच शहराची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे शहराला झळाळी प्राप्त झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा उद्रेक सुरु असला तरी शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे.

ठाकरे सरकार : लग्नाला परवानगी; धार्मिक कार्यक्रमांना का नाही? ज्येष्ठ किर्तनकार उवाच  

गोडीची जोड देणे साता-याची खासियत! 

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला जिलेबीच्या गोडीची जोड देणे ही साता-याची खासियत. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात टनावर जिलेबीची उलाढाल होते. या वर्षीही आनंद जिलेबीच्या पाकात मुरवूनच स्वातंत्र्यदिनाचा घेण्यास साताकर सज्ज होते, तसेच जिलेबीसोबतच इतरही मेवामिठाईची दुकाने ग्राहकांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सज्ज झाली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेयासाठी जिल्हा प्रशासनाने आज (मंगळवार) सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टला जिलेबीचे उत्पादनच करु नये असा आदेश काढला आहे. यामुळे साताऱ्याच्या जिलेबीचा गोडवा यंदा चाखता येणार नाही.

जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे.., वाचा तिच्या विषयी

असा आहे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

देशात येत्या शनिवारी (ता. 15) स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधुन सर्वत्र मिठाईचे, खासकरुन जिलेबीचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होवुन, सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवुन सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असे मत सातारा जिल्हा प्रशासनाचे झाले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (ता.15) सातारा जिल्ह्यात कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्या पासून ते दुसऱ्या दिवशीच्या रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत मनाई करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not To Sale Jalebi On Independence Day Orders Satara District Collector