
Ramraje Naik-Nimbalkar addressing workers in Satara; urges them to focus on the fight ahead, saying “Party can be decided later.”
Sakal
फलटण : सध्या तालुक्यात खोट्या केसेस, दमदाटीचे राजकारण सुरू झाले आहे. सत्तेचा गैरवापर करून आम्ही कधीही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, कारण ते आमचे संस्कार नाहीत; पण आता ही निवडणूक आमची राहिलेली नसून कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाची आणि शांततेने जगण्याची लढाई बनली आहे. आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय, उद्या नागरिक म्हणून हा त्रास भोगावा लागणार आहे. त्यामुळे आता लढायचं, कुठला पक्ष ते नंतर बघू, असे आवाहन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.